Pages

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

ओढ निसर्गाची

 ओढ निसर्गाची

                     



The road with flowers

पावसाळा संपता संपता उन पावसांचा खेळ सुरु होतो. थोडयाशा पावसाने भिजलेले रस्ते, पायवाटा उन्हात ओलसर सुक्या होतात. खेडयातील हया पायवाटा तर एवढया सुंदर वाटतात, की अगदी भान हरपून जाते.

ओठी नकळत मराठी गाणं येते.

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा......

माझ्या मनातला का तेथे असेल रावा.......


                 
 गवत वाढलेलं असतं. गवताचे तुरे वाटेवर आडवे झालेले असतात. गवताच्या तुऱ्याला पण फुलोरा आलेला असतो. सहजच नजर फिरवली तर अशी असंख्य रान वनस्पती फुललेल्या असतात. पण आपण त्याची कधी दखलच घेतलेली नसते. पण जर का तुम्ही निरखुन पाहिली नं तर निसर्गाची कलाकृती पाहून खरच दंग व्हायला होत. माणसाने इंद्रधनुष्याचे रंग बनविले. निळा, पिवळा, लाल, पांढरा, काळा, हिरवा इ. पण हेच रंग निसर्गाच्या कुंचल्यातुन हया झाडा-फुलांवर रेखाटलेले असतात ना त्यांत जिवंतपणा जाणवतो.

                  आपल्याला गुलाब, जाई, मोगरा, केवडा तसेच जास्वंद, तगर, रातराणी, शेवंती ही फुले परिचित असतात. पण अशी असंख्य निनावी फुले रानावनात फुलत असतात.

flowers

flowers


 मला त्यांची नावे शोधण्यात रस नाही. पण त्यांच सौंदर्य न्याहाळण्यात आनंद वाटतो. निरोपयोगी गवत म्हणून वाढलेली वनस्पती इतकी सौंदर्य असू शकते. मुळात निसर्गात असलेली कोणतीही वनस्पती निरोपयोगी नसतेच. हे फक्त माणसाला उपयोग नसतो किंवा माहित नसतो म्हणून आपण निरोपयोगी ठरवतो.

                   अशा रंगबेरंगी वनस्पतींच्या फुलांनीच तर निसर्ग बहरतो आणि आपल्याला भावतो. संसाराच्या रहाटगाडग्यात अस्वस्थता, ताण घालवायला निसर्ग हवाच. अशाच काही निनावी वनस्तींची टिपलेली छायाचित्रे. पिवळया पाकळयांचा मध्ये मातकट पुंकेसर असलेली रानभेंडीचे फुल न्याहाळताना अगदी भारीच वाटतो.

ladies finger flower

 त्यातच कुरडूच्या फुलांचा मनोरा डोलत असतो. पांढरत काहीसा लालसर छटा असलेला तुरा.




 छोटी छोटी पिवळी फुलांचा हिरव्या पानांवर पसरलेला सडा.





 तर कुठे तेरडयाचा गुलाबी रंग व्यापलेला. मध्येच निळया पांढऱ्या फुलांनी ठिपक्या सारख्या सजवलेला साज. 





अगदी मनमोहकच. बधा एकदा निरखुन तुम्हालाही त्याची अनुभूती येईल. व्हा समरस निसर्गाशी. संवाद साधा निसर्गाशी. आणि आम्हालाही कळवा.


मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

पॉवर ऑफ चॉइस


पॉवर ऑफ चॉइस


सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत यानी सांगितलेला हा किस्सा आहे.
-----------------------
मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्या समोर एक टॅक्सी येऊन उभी राहीली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून  टॅक्सीला वळसा घालुन माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला  इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता  पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले  माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु ! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’
मिशन स्टेटमेन्ट ?’ मला गंमत वाटली  मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख  ठळक अक्षरात छापले होते. ‘वासुचे मिशन स्टेटमेन्ट ! माझ्या टॅक्सी मधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षितपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे  ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’
मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो  मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुन सुद्धा बाहेरच्या सारखी चकचकीत स्वच्छ होती.
वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार ? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच डिकॅफकॉफीआहे!’
मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’
काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर  डायट कोक, लस्सी, पाणी  ऑरेंज ज्युस आहे.’
मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेऱ्यावरचे आश्चर्य काही लपत नव्हते.
माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये  हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स  इंडिया टुडे आहे.’
माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स  त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’ मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टॅक्सी सुरु करताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना  आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’
वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगीतले. तसेच वाटेत कोण कोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहिती दिली.
आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाहीवासु म्हणाला.
मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’
वासुच्या चेहेऱ्यावर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासुनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्व सामान्य टॅक्सीड्रायव्हर सारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला पॉवर ऑफ चॉइसबद्दल कळले!’
पॉवर ऑफ चॉइस म्हणजे ?’ मी उत्सुकतेने विचारले
पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात  म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा ! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत क्वॅक क्वॅककरत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्यावर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसलेवासु म्हणाला
आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा  होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजु बाजुला निरिक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे  गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी  घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्या बद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब  अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता.
मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले.
झाला तर!’ वासु उत्साहाने सांगू लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षा पेक्षा दुपटीने वाढले या वर्षी कदाचित माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’
गरुड व्हा, बगळा होऊ नका !
वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा  होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.
बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हा चॉइस देवाने प्रत्येकालाच दिलेला आहे, अगदी जन्मा पासून ते मरे पर्यंत!
आता आपण बगळा व्हायचे का गरुड व्हायचेहे ज्याचे त्याने ठरवायचे नाही का ?
 B+tive


A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा