Pages

रविवार, २३ जुलै, २०१७

thaught of life

थोडस जीवनाबद्दल 

                      आज आपण हे वाचत आहात. ती वेळ व  न चुकवता येणारा मृत्यू यामधील काळ म्हणजेच जीवन होय. मृत्य कधी येईल हे  आपल्याला ठाऊक नाही, किती वर्षे, किती दिवस, किती तास, सेकंद काहीहि सांगता येत नाही. कदाचित पुढच्या क्षणीही दत्त (यम ) म्हणून उभा राहू शकतो. आणि माणूस मात्र आताचा क्षण जगायचं सोडून भविष्याची चिंता करीत बसतो. आपला भूतकाळ आठवून आठवून मनाला दुखी करत असतो. मृत्यू हि एक प्रक्रिया आहे. ह्या जगात सजीव म्हणून जन्माला येण व मृत्यू येणं हि जन्म व मृत्याची एक प्रक्रिया आहे. परंतु माणूस जन्माचा आनंदत्सोव साजरा करतो आणि मृत्यूला घाबरतो, वाईट मानतो. याच कारण स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर केलेल्या शोध व भौतिक जीवन. याची त्याला सवय होते. 
                       माणसाला लाभलेल्या अचाट बुद्धीचया वापर करून नवनवीन शोध लागले. त्याचा उपभोग घेतो आणि मग त्याला त्याचे व्यसन लागते. त्यालाच मग तो जीवन समजू लागतो. परंतु हा भ्रम असतो. तो भ्रम फुटतो तो मृत्यू समोर उभा ठाकल्यावर. केविलवाणी धडपड करूनही जेंव्हा त्याला उमगते कि आपली आता हे शरीर त्यागाची वेळ झालेली आहे, तेंव्हा त्याची या जीवनावरची आसक्ती संपते आणि जाणीव होते. ती आपल्या जन्माच्या कारणांची. आपण या जगात का आलो त्याची. कारण काय ?
                        आयुष्य या का चे उत्तर शोधण्यात बहुतांशी लोक अपयशी ठरतात अथवा त्यांना त्याची जाणीवच नसते. ते जगात असतात भौतिक जगात. 
                        तर मित्रहो आपल्या जीवनाची चौकात सोडा आणिग आताच क्षण जागा. मजेत जागा.  
                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा