Pages

रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५

मोबाईल हरवला की आयुष्य अर्धं थांबतं!

 

lost mobile


कधीकाळी लोकांना पाकीट हरवलं की काळजी वाटायची.

आता काळ बदललायआता पाकीट हरवलं तरी चालतं,
पण मोबाईल हरवला तर आयुष्यच थांबतं! 😅

मोबाईल हरवला की सगळं काही संपल्यासारखं वाटतं.
पहिली भावनाअरे देवा! फोटो, व्हॉट्सअॅप, नंबर, OTP, UPI... आता काय?
दुसरी भावनाकोणीतरी उघडून माझे फोटो पाहिले तर?
आणि तिसरीमाझा नंबर बंद करा, नाहीतर मीच बंद होईन!

🔍
मोबाईल हरवण्याची तीन अवस्था

1.
नकार (Denial):
  
नाही नाही, इथेच कुठेतरी आहेबॅगमध्ये, खिशात, उशीखाली
   (
तासाभराने कळतंनाही आहेच!)

2.
आशा (Hope):
  
थांब, ‘Find My Phone’ वापरतो.
   (
पण लोकेशन दाखवतं – ‘डिव्हाईस ऑफलाइन’)

3.
निराशा (Depression):
  
मग सुरू होते सिम ब्लॉक, पासवर्ड बदल, बँक OTP त्रास,
  
आणि शेवटी नवीन मोबाईल घेऊ हा महागडा निर्णय! 😬

📊
मजेशीर पण खरं वास्तव

एका सर्वेक्षणानुसार भारतात प्रत्येक मिनिटाला २० मोबाईल हरवतात.
पण त्यापैकी निम्मे मोबाईल घरातच सापडतात!
म्हणजे मोबाईल हरवण्यापेक्षा,
आपणच त्याला नीट ठेवत नाही हे खरं. 😅

💡
थोडं शहाणपण

1.
मोबाईलमध्ये ट्रॅकर  ठेवा.
2. Google Find My Device
चालू ठेवा.
3.
महत्वाचे फोटो, नंबर क्लाउडवर बॅकअप करा.
4.
आणि सर्वात महत्वाचंमोबाईलपेक्षा थोडं स्वतःकडेही लक्ष द्या!

🎯
निष्कर्ष

मोबाईल आपल्यासाठी आज साथी झाला आहे.
तो हरवला की असं वाटतंजणू कुणीतरी आपल्या आयुष्यातून गेला.
पण खरं सांगायचं, तर मोबाईल हरवला तरी आयुष्य थांबत नाही
थोडं वेळेसाठी फक्तसिग्नल लोहोतो! 📶😂

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

नो कॉस्ट EMI खरंच फायदेशीर आहे का?

 नो कॉस्ट EMI खरंच फायदेशीर आहे का?

NO COST EMI

            सध्या टिव्हीवर, सोशल मिडीयावर आकर्षक जाहीरात दिसत आहे.
Great Indianfestival, big billion day, इ. ग्राहक राजाला खुष करण्यासाठी नव नवीन जाहीरातींचा मारा सुरु आहे. पुर्वी एखदी वस्तु खरेदी करायची असेल तर पै-पैसा जोडून मग खरेदी केली जात असे. पण सध्याच जग वेगळं आहे. तुम्हाला एखादी वस्तू आवडली तात्काळ घ्या. तुमच्याकडे पैसे नसतील तर emi वर घ्या. त्यातही No Cost EMI सध्या जोरात सुरु आहे.

नो कॉस्ट EMI म्हणजे काय?

EMI (Equated Monthly Installment) म्हणजे वस्तू घेतल्यावर तिची किंमत हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा.
साधारणपणे EMI योजनेत व्याज (Interest) लागते, त्यामुळे वस्तूची मूळ किंमत जास्त पडते.
पण नो कॉस्ट EMI मध्ये ग्राहकाला व्याज द्यावे लागत नाही.
यात ग्राहकाने वस्तूची जी मूळ किंमत आहे, तीच किंमत ठराविक महिन्यांमध्ये विभागून भरावी लागते.

नो कॉस्ट EMI कशी चालते?

1. ग्राहकासाठी:
-
मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, गॅझेट्स खरेदी करताना 'नो कॉस्ट EMI' निवडला, तर एकदम पैसे देता हप्त्यांमध्ये भरता येतात.
-
उदा. मोबाईलची किंमत ₹12,000 असेल आणि 6 महिन्यांचा नो कॉस्ट EMI निवडला, तर दरमहा ₹2,000 भरावे लागतात.

2.
विक्रेता/बँक/फायनान्स कंपनीसाठी:
- EMI
वर लागणारे व्याज बँक किंवा फायनान्स कंपनी आकारते.
-
पण नो कॉस्ट EMI मध्ये हे व्याज विक्रेता, ब्रँड किंवा -कॉमर्स कंपनी स्वतः भरते.
-
कधी कधी ग्राहकाला मिळणारा डिस्काउंट कमी करून त्यातून हे व्याज भरले जाते.

📊 नो कॉस्ट EMI उदाहरण

वस्तू

मूळ किंमत

EMI कालावधी

दरमहा EMI

अतिरिक्त व्याज

मोबाईल

₹12,000

6 महिने

₹2,000

नाही

टीव्ही

₹24,000

12 महिने

₹2,000

नाही

लॅपटॉप

₹30,000

10 महिने

₹3,000

नाही

🆚 साधारण EMI आणि नो कॉस्ट EMI तुलना

प्रकार

मूळ किंमत

EMI कालावधी

व्याज

एकूण रक्कम

साधारण EMI

₹12,000

6 महिने

12%

₹12,720

नो कॉस्ट EMI

₹12,000

6 महिने

0%

₹12,000

लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे

साधारण EMI मध्ये व्याजामुळे एकूण रक्कम जास्त लागते.
नो कॉस्ट EMI मध्ये फक्त मूळ किंमत भरावी लागते, अतिरिक्त खर्च नसतो.
ही सुविधा प्रामुख्याने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा Bajaj Finserv सारख्या EMI कार्डवर उपलब्ध असते.
उत्पादन परत केल्यास (Return) काही क्लिष्ट नियम लागू होऊ शकतात.

निष्कर्ष

साधारण EMI मध्ये व्याजामुळे ग्राहकाला जास्त पैसे द्यावे लागतात. पण नो कॉस्ट EMI मध्ये मूळ किंमत जितकी आहे तितकीच भरावी लागते, म्हणून ग्राहकाचा थेट फायदा होतो.

बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५

EMI वर मोबाईल घेताय तर वेळेवर हप्ता भरा नाहीतर मोबाईल बंद होऊ शकतो.

 
mobile emi

EMI वर मोबाईल घेताय तर वेळेवर हप्ता भरा नाहीतर मोबाईल बंद होऊ शकतो.

        सध्या बाजाराम apple, samsung सारख्या कंपन्यांकडून महागडे स्मार्ट फोनची क्रेज आहे. त्यामुळे नव नवीन फीचर्सचे मोबाईल घेण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. आता सर्वांना रोख रकमेने विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे विविध वित्तीय कंपन्यांनी फोन घेण्यासाठी कर्जाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. फोनवर सगळे व्यवहार होत असतात. जसे फोनद्वारे पैसे देणे-घेणे, बँकांची स्टेटमेंट, इ.जुन्या फोनमध्ये नवीन अपडेटेड ॲप सपोर्ट करीत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा फोन चांगला असूनही नवीन घ्यावा लागतो. आता नवीन घेतच आहोत तर जरा लेटेस्ट चांगला फोन घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. पण तो जरा महाग असतो. त्यावर पर्याय कर्जाचा असतो.

         वित्तीय कंपन्या अशा फोन विक्रेत्यांकडे सहज लोनची सोय उपलब्ध करुन देण्यात येते. अर्थात त्यांचा हा व्यवसाय असतो. गिऱ्हाईकांना 0% लोन सुविधा, कमीत कमी डाऊन पेमेंट सुविधा इ. आकर्षक आलोभने दाखविली जातात. प्रत्यक्षात फ्री काहीच नसते. सणासुदीला जसे दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, स्वातंत्रयदिन, पाडवा अशा सणाला तसेच पावसाळी ऑफर अशा प्रकारे आकर्षक जाहीराती आपल्याला आढळतात.

         असा जर तुम्ही फोन घेतला असेल आणि वेळेवर जर emi भरला नाही. तर आता कंपन्या तुमचा मोबाईल बंद करु शकतात. प्रत्येक मोबाईलला IMEI क्रमांक असतो. त्या आधारे वित्तीय कंपन्या (Finance company) अशा प्रकारे मोबाईल ब्लॉक करु शकतात. त्यामुळे जर तुम्ही emi वर मोबाईल घ्यायचा विचार करीत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. वेळेवर हप्ता भरा. अन्यथा व्याजाची  रक्कम शिवाय फोन ब्लॉक केल्याने तुमची कामे थांबू शकतात. 

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा