Pages

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

झरा


झरा


शांत डोहावर कधी विश्वास ठेवू नये.. खोल बरच काही कुजलेलं मिळतं. उथळ वहणारं नितळ पाणीच उत्तम पिण्यायोग्य असतं.

माणूसही तसाच असावा, त्याच्या स्वभावात खळखळाटच असावा असं नाही पण कमालीचा सायलेंटपणा मात्र मुळीच नसावा, कधी कधी या सायलेंटखाली त्याचं दबलेलं पुर्वआयुष्य मिळेल. उलट  कधी पुर्णत: घमेंड, कुजकेपण याचा दर्प खोल आत दिसेल.

सतत वाहत रहावं नितळ -यासारखं, लोकं म्हणु देत उथळ पाण्याला खळखळाट फार... तो खळखळाटच पाणी शुद्ध ठेवतो. डोह कधी कधी तळाशी घमेंड, कुजकेपणा या असल्या पदर्थांनी कुजका निघु शकतो.

बेफिकीर पणे  मांडावं आपण आहोत तसे, लोकं मग ठरवतील तुमचा बरे वाईटपणा... स्वच्छंदीपणा हवा जगण्यात वागण्यात फक्त नैतिकतेचा लगाम हवा त्याला.. बाकी उधळा जगणं मुक्त हस्ताने... आयुष्य फार सुंदर आहे, ते असं कुजकेपणाणे कुणी वाया घालू नये .

बिनधास्त तारीफ करा, एखाद्या सुंदरतेची एखाद्या फुलाची, वेलाची, निसर्गाची आणि सुंदर एखाद्या मुलीचीही बरं का.. तिला तिची सुंदरता कळू द्या.. आवडली तर आवडली म्हणा, बिनधास्त... सगळे विकार अपेक्षा बाजूला ठेवुन मात्र..!!

कुढुन मुळीच जगू नका, आयुष्य विश्वाचा वेळ पाहता फक्त तसूभर आहे... दिलखुलास जगा.

सगळं उपभोगलं पाहीजे. थरार, आनंद, सुंदरता, आव्हानांना सामोरं जाण्यात आणि त्यानंतरच्या जिंकलेपणात जो आनंद असतो तोसुद्धा वेचता आला पाहीजे. डब्यासारखं एकाच ठिकाणी बसून जमत नाही. चारीआर मनाला घुमवलं पाहीजे. वैराग्याची भगवी वस्त्रे कधीच परिधान करु नका. कारण ती घातल्याने आतल्या चेतना मरत नाहित.

सर्व आसक्ती जीवंत असू द्या, त्या जिवंत असणं हे आपण जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यांना फक्त सुंदरतेची झालर असू द्या, मग त्यांचं उपभोगणंही सुंदर होवून जाईल .जगणही सुंदर होवून जाईल...!!

खळखळत जगा..
नितळ -यासारखं  शुद्ध..!!

Be positive and be happy...! Have a nice day



Be positive and be happy...! Have a nice day


माझ्या घराजवळ बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते.
तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची.
दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची...

इंजिन आणि डबे रोज बदलली जायची,
पण...
फक्त अर्धी निकर घातलेला छोटा मुलगा हातातलं फडकं  फिरवत गार्ड व्हायचा...

आज न राहवून
 थांबून मी त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले,

"बाळ तू रोज गार्ड होतोस, तुला कधी इंजिन, कधी डबा व्हायला आवडत नाही का?"
त्यावर तो मुलगा उत्तरला...

"बाबूजी मला घालावयास सदरा नाही त्यामुळे मागच्याला धरायला काही नाही. मग माझ्या मागे कोण येणार ?"
म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो...

 "हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले...

त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला !

आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काही  ना काही कमतरता असणारच...
तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.

त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई- बापावर रागावून, रुसून रडत बसता आले असते...
पण,
 तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला.
आणि जीवनाच्या खेळाचं अंग बनून राहिला.

मित्रांनो चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचं अंग व्हायचे आहे.
सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या...

Be positive and be happy...! Have a nice day

लक्ष


लक्ष 

एक मुलगा प्रिन्सिपलकडे गेला आणि म्हणाला, "मॅडम, आता मी शाळेत येणार नाही."
प्रिन्सिपलने  विचारले "पण का?"
मुलगा म्हणाला " मी एका शिक्षकाला दुसऱ्या शिक्षकांबद्दल वाईट बोलताना पाहिले ; आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते चांगल शिकवत नाहीत ; कर्मचारी चांगले नाहीत ; विद्यार्थी त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांना त्रास देतात आणि इथे अनेक  चुकीच्या गोष्टी होतात ....
प्रिन्सिपल ने उत्तर दिले "ओके. पण आपण शाळा सोडण्यापूर्वी, माझ्यासाठी कृपा करून मी सांगतो  ते काम कर. एका काचेच्या प्यालात पाणी घ्यायचं आणि एकही थेंब न सांडता  शाळेभोवती तीन वेळा चक्कर मार व नंतर, तू तुझी इच्छा असल्यास शाळा सोड "
मुलाने विचार केला: हे खूप सोपे काम आहे!
प्राचार्यांनी सांगितले म्हणून त्याने शाळेला तीन वेळा चक्कर मारली . जेव्हा  त्याचे तीन राऊंड संपले तेव्हा त्याने प्रिन्सिपलला सांगितले
प्रिन्सिपलने विचारले "जेव्हा तुम्ही शाळेला राऊंड मारत  होता, तेव्हा तुम्ही एका शिक्षकाने दुसर्या शिक्षकांबद्दल वाईट बोलत असताना पाहिले का?"
त्या तरुणाने उत्तर दिले, "नाही."
" सिनिअर विद्यार्थी ज्युनिअर  विद्यार्थ्यांशी चुकीच्या पद्धतीने वागताना पाहिले का?"
"नाही"
"शिक्षक शिकवताना पाहिले का?"
"नाही"
तेव्हा प्रिंसिपल त्याला म्हणाले की
"तुझे लक्ष फक्त पाण्याच्या ग्लासावर होते, त्यामुळे  दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे  तुझ्या ग्लासातील एकही थेंब न सांडता तू तुझं ध्येय पूर्ण करु शकलास . 

आपल्या आयुष्याचेही असेच आहे .जेव्हा आपण आपले लक्ष्य / ध्येय (Target ) सुनिश्चित करतो व ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला इतरांच्या चुकांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो "
मतितार्थ.....
इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा व त्यालाच प्राधान्य द्या .....

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

देवावरची अपार निष्ठा

देवावरची अपार निष्ठा


ज्याचा देवावर विश्वास नाही त्याने जरुर वाचा 🔆

भारतातील प्रख्यात हार्ट स्पेशालिस्ट डाॅ. मांडके आज खूप आनंदात होते.

त्याला कारणही तसेच होते. नुकताच त्यांना त्यांच्या शोधनिबंधासाठी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला होता.

त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते विमानाने दिल्लीला जायला निघाले होते.

ठरल्या वेळी विमानाने उड्डाण केले.

डाॅ. मांडके विचारात गढून गेले होते. त्या शोधनिबंधासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. रात्रंदिवस ते संशोधनात मग्न असत. अनेक विचारांची दाटी झाली होती त्यांच्या मनात....

इतक्यात ....

अचानक ...विमानाचे आपातकालीन लँडींग करण्यात आले.

डाॅ. मांडके समारंभाला वेळेवर पोहोचण्याच्या काळजीत पडले...

विमानतळावरील अधिकारी त्यांना म्हणाले की पुढची फ्लाईट 10 तासांनी आहे.

त्यामुळे डाॅक्टरांनी एक कार भाड्याने घेऊन पुढे जायचे ठरवले.

जवळपास 5 ते 6 तासांचा तो प्रवास होता.

त्यांना गाडीने जायचा कंटाळा आला होता कारण ते दमलेले होते आणि त्यांना थोडा आराम हवा होता.

पण काहीच पर्याय नसल्याने ते गाडी चालवत निघाले....

प्रवास सुरु होऊन एखादा तास झाला होता ..इतक्यात ..वातावरण अचानक बदलले आणि खूप जोराचा पाऊस सुरु झाला..

रस्त्यावरचे बोर्ड नीट दिसत नव्हते.
बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते रस्ता चुकले आहेत...

पावसाचा जोर वाढतच चालला होता. नाईलाजाने आसरा शोधून थांबावेच लागणार होते.

सुदैवाने थोड्याच अंतरावर त्यांना एक लहानसे कौलारु घर दिसले.

कसेबसे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला.

एका तरुण स्त्रीने दार उघडले आणि अगत्याने त्यांना आत येण्यास सांगितले.

तिचे घर अगदीच साधे होते. घरात सामानही अगदी थोडेच होते. कोणत्याच महागड्या वस्तू नव्हत्या.

त्या स्त्रीने डाॅक्टरांसाठी चहा आणि काही बिस्किट आणले.

जरा वेळाने ती म्हणाली ..

माझी प्रार्थनेची वेळ झाली आहे. आपण माझ्यासोबत प्रार्थना करणार का?

डाॅक्टरांचा फक्त कर्मयोगावर विश्वास असल्याने त्यांनी नम्रपणे नकार दिला!

ती स्त्री उठली आणि एका छोट्या कोनाड्यात असलेल्या मुर्तिसमोर दिवा लावून प्रार्थना करायला लागली.

प्रत्येक कडव्यानंतर ती तिथे ठेवलेला एक छोटासा पाळणा हलवत होती.

डाॅक्टर तिचे निरिक्षण करत होते आणि त्यांच्या मनात तिला विचारण्यासाठी अनेक प्रश्न तयार होते!

काही वेळाने तिची प्रार्थना संपली.

डाॅ. नी तिला विचारले ...

या सगळ्यांचा तुम्हाला काही उपयोग झाला का कधी?

देवाने कधी तुमची हाक ऎकली आहे का?

आणि तुम्ही तो छोटासा पाळणा का हलवत होतात?

....

त्या स्त्रीच्या चेहे-यावर अचानक खिन्नता आली...

खोल आवाजात ती म्हणाली ...

"माझ्या 2 वर्षांच्या मुलाला जन्मत: ह्रुदयरोग आहे...
मुंबईतील प्रख्यात डाॅ. मांडके सोडून त्याचा इलाज कोणीही करू शकणार नाही. पण त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे नाहीत..

मी रोज देवाला प्रार्थना करते की कसेही करुन मला त्यांच्यापर्यंत ने आणि माझ्या मुलाला जीवदान दे. मला खात्री आहे.. एक दिवस देव मला नक्की मदत करेल..."

...

पुढचे बरेच क्षण तिथे सुन्न शांतता पसरली ...

डाॅ. मांडके अगदी स्तब्ध झाले ...
काय बोलावे ते कळेनाच त्यांना ...

त्यांनी मागच्या काही तासांमध्ये घडलेल्या घटनाचक्राचा विचार केला ...

कोणतेच लक्षण नसताना हवामान खराब होऊन विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही....

गाडीने जाताना पावसाने रस्ता चुकला ...

याच घरात आसरा घ्यावा लागला ...

आणि ...आता त्या स्त्रीने सांगितलेली वस्तुस्थिती ....

...

काय अद्भूत् ..चमत्कारच जसा ..

काही क्षणातच डाॅ. भानावर आले. त्यांनी तिला त्यांची ओळख सांगितली आणि वातावरण ठीक झाल्यावर तिला आणि तिच्या बाळाला घेऊन ते मुंबईला निघाले ...!

...

सोबत आणखी एक गोष्टपण घेतली त्यांनी ....

देवावरची अपार निष्ठा !

...

कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप काही जास्त मिळाले होते त्यांना..!!

या जगात कोणतीतरी शक्ती नक्कीच आहे, ती कोणत्या रूपात आहे सांगता येत नाही, प्रत्येक धर्मात वेग वेगळी तत्व सांगितली आहेत,पण देव आहे एवढे मात्र नक्की



CLICK HERE
CLICK HERE

फर्स्ट गिअर

फर्स्ट गिअर




           गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली........
गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअर' टाकतो.
हा 'फर्स्ट गिअर' म्हणजे
आपल्या जवळची सख्खी माणसं. आई बाबा,जोडीदार, मुलं,जवळचे मित्र...
हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही.  मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता 'पुढे' जात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कार' फर्स्ट गिअर करतो.
इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार नाही' याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो.
परंतु गाडी'पळण्यासाठी'इतका कमी वेग
पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर
टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व
कळू लागतं. शाळा,कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद,विविध कला.....
बाहेरचं जग किती मोठं आहे
आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं.
समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.
गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून  मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडा लत्ता, भांडीकुंडी,पहिला फ्रीज,
पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग,
सणासुदीला नवीन कपडे,चांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं.
या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य,
पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.
आपण आता फोर्थ गिअर' टाकतो.

गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग- मल्टीप्लेक्स, गाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop, ह्याउ नि त्याउ..!
या वेगाची नशाच काही और!
गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही...
आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी... खर्व.... निखर्व...... रुपये नाहीत, गरजा!
हा 'वेग'खूप आनंददायी असतो.
आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये,
'लाल'सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....
आणि... आणि.....आणि.....
नियती
नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो. गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो.
पाच.. चार.. तीन..दोन...एक....खाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो. पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता याचा विसर पडला होता.
वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती... आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं.
गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे..मला सांगा कुठला गिअर टाकाल ?
सुसाट वेगाचा पाचवा गिअर ? की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट गिअर' ?
आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण
आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ?
कोणी दिला होता आधार ?आठवून पहा.
प्लाज्मा टीव्हीने ?
EMIभरत विकत घेतलेल्या extra बेडरूमने?
नव्या कोऱ्या गाडीने ?
'You are promoted' असं लिहिलेल्या कागदाने ?
मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ.
तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने !
आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा,
निरागस प्रश्न विचारून
आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं,
'होईल सगळं व्यवस्थित'म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी'बायको' नावाची मैत्रीण, 
बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 
'त्या'काळात आपल्या frustration
चा ‘कानहोणारे आणि योग्य सल्ला देणारे
'जिवाभावाचे मित्र' हे सगळे हे सगळे फर्स्ट
गिअर तुमची गाडी ओढत नव्हते का ? 
Don't get me wrong.  माझा चवथ्या- पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी आपल्या'फर्स्ट गिअर्स'चं स्मरण ठेवूया. 
आयुष्याचा वेग मधून मधून थोडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.
Enjoy life!!!

https://amzn.to/2wSScXk

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा